बिबट्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार; दोन जखमी

वाल्हे – पुरंदर तालुक्‍यातील दौंडज गावच्या तरसदऱ्यात शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता बिबट्याने मेंढरांच्या कळपावर केलेल्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या आहेत. तर अन्य दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत.
दौंडज खिंड येथील तरसदऱ्यात कडेपठार देवालयाच्या पूर्व डोंगरपायथ्याला प्रकाश बबन दगडे हे मेंढया चारत होते. त्यावेळी अचानक बिबट्याने झाडावरून उडी मारून मेंढ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये दोन बकऱ्या जागीच ठार झाल्या. यावेळी प्रकाश दगडे यांनी बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिबट्याने दुसऱ्या बकऱ्यांवर हल्ला केला. त्यामध्ये दोन बकऱ्या जखमी झाल्या आहेत. जखमी बकऱ्यांवर वाल्हे येथील पशु वैद्यकीय अधिकारी एन. एस. सोनवणे व परिचारक एस. बी. भंडलकर उपचार करीत आहेत. जेजुरीचे वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, जे. जे. खांदे, वनमजूर बाळासाहेब चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
याविषयी वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी सांगितले की, हल्ल्यातील जखमेतील दातांचा आकार मोठा असून हा हल्ला बिबट्यानेच केला आहे. मेंढपाळ प्रकाश दगडे यांनी सांगितले की, मेंढ्या चरत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. त्याची उंची अडीच फुट तर लांबी साडेतीन फुटा पेक्षा जास्त होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)