बिबट्याच्या हल्ल्यात घोडी ठार

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील जारकरवाडी येथील लोलेवस्तीवर मेंढपाळ पोपट माने यांच्या मेंढ्यांच्या तळावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक घोडी ठार झाली तर एक शिंगरू जखमी झाले आहे. त्यामुळे वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
बिबट्याच्या उपद्रवामुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून जारकरवाडी ग्रामपंचायतीने वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला आहे. वनरक्षक एन. एस. अनसुने यांनी नागरीकांना सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे. आंबेगाव तालुक्‍याचा पूर्व भाग हा बिबट्या प्रवण म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारंवार बिबट्याचे दर्शन नागरिकांना दिवसाही होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)