बिबट्याच्या भर वस्तीत येऊन वासरावर हल्ला

ठोसेघर, दि 1 (प्रतिनिधी) – आंबळे-सज्जनगडच्या असलेल्या आंबळे गावामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भरवस्तीत गोटात शिरून बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यामध्ये वासरू गंभीर जखमी झाले आहे. भर वस्तीत येऊन बिबट्याने वासरावर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आंबळे गावामधील गजानन जगन्नाथ पिंपळे यांच्या घराबाहेर गोठ्यामध्ये गीर जातीच्या गाई व वासरू बांधलेली असताना शनिवारी मध्यरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि गाईच्या हंबरण्याचा जोरात आवाज येऊ लागल्यामुळे कुटुंबीयांनी बाहेर येउन पाहिले असता गोठ्यात जंगली श्वापद असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यांनी गोठ्याकडे धाव घेतल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती कळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याने भर वस्तीत येऊन केलेल्या हल्ल्यामुळे आंबळेसह रायघर, कारी परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)