बिबट्याची पावले आता सिमेंटच्या जंगलाकडे…

संग्रहित छायाचित्र

आसखेड येथील हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

भामा आसखेड / राजगुरूनगर- पुणे जिल्ह्यात आतापर्यंत जुन्नर, शिरूर, आंबेगाव तालुक्‍यात बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरू आहे. या तालुक्‍यांना बिबट्यांचा हल्ल आता नित्याचाच झाला असून या तालुक्‍यात तो या तालुक्‍यांतील एक सदस्य असल्या सारखा या तालुक्‍यांमध्ये वावर असतो व नागरिकांना दर्शन देत असतो. तसेच गेल्या काहि दिवसांपूर्वी खेड तालुक्‍यात बिबट्या दिसल्याची बातमी पसरली होती; परंतु पुरावा मिळत नसल्याने वनविभाग त्यावर विश्‍वास ठेवत नव्हते. परंतु काल (बुधवारी) बिबट्याने शेतात काम करणाऱ्या दोघांवर हल्ला केल्यानंतर बिबट्या असल्याचा पुरावा मिळाल्यानंतरच वनविभागाच्या हालचालींना वेग आला. त्यामुळे आत्ता बिबट्याने आपला मोर्चा या तालुक्‍यात फिरवला असल्याचे या हल्ल्यामुळे अधोरेखित झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बबन वेहळे व अरुण गाडे (रा. आसखेड, ता. खेड) हे दोन शेतकरी जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती अशी की, बिबट्यांना जंगलात लपण्यासाठी जंगल राहिले नाही, त्यात त्याला शिकार मिळत नसल्याने शिकारीच्या शोधात बिबट्या लोकवस्तीत येत आहे.वस्तीमधील पाळीव जनावरे, कुत्री यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून तो हल्ले करत आहे. त्यामुळे गाव, वस्ती, शेतावर रहाणारे नागरिक भयभीत झाले आहेत.

काल सकाळच्या सुमारास आसखेड येथे एका शेतकऱ्याला शेतात बिबट्यासह दोन बछडे दिसले त्यांनी वनविभागाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वनविभाचे कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी शोध मोहीम राबविली त्यावेळी बिबट्याचे दोन बछड शेतात शोधून ताब्यात घेतले मात्र, बिबट्या मादीचा शोध लागला नाही. बिबट्या मादी बछड्यांसह शेतात दिसुन आल्याने संपुर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. चाकण वनविभागाच्या मदतीने गावकऱ्यांनी बिबट्या मादीचा शोध घेत असताना अचानक बिबट्याच्या मादीने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, चाकण वनविभागाने जुन्नर विभागाच्या टीमला पाचारण केले असून मादी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सायंकाळी उशीर पर्यंत सुरू होते मात्र, मादी बिबट्या वनविभागाच्या हाती लागला नाही.

हल्ले न होण्यासाठी दक्षता घेतली जातेय
बिबट्याचा वावर लोकवस्तीत वाढत असताना पाळीव जनावरांसह आता माणसांवरील हल्ल्यांमुळे परिसरात शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्याचा लोकवस्तीचा वापर वाढत चालल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने वेळीच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, चाकण वनविभागासह जुन्नर वनविभागाची टिमही आसखेड येथे बिबट्याच्या शोधात कार्यरत असून बिबट्या मादीने अजुन कुठे हल्ला करु नये, अशी दक्षता घेतली जात असल्याची माहिती वनबिट प्रमुख सुवर्णा जगताप यांनी सांगितले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)