बिबट्याची कातडी व नख्यासह एकाला अटक

पुण्याच्या शोरुम मधून कातडी,नख्यांची चोरी
सातारा.दि.7(प्रतिनिधी)

सुमारे पाच वर्षांपूर्वी शिकार केलेल्या बिबट्याचे कातडी व नख्या विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या जोतिराम तुकाराम कदम (रा.जांभेकरवाडी ता. पाटण) यास वनविभागाने जेरबंद केले. या प्रकरणात पुणे आणि सातारा तालुक्‍यातील आणखी दोघा संशयितांची नावे समोर आली आहेत.
जोतिराम कदम हे दोन महिन्यांपूर्वी पुणे येथे एका दुचाकी शोरूमची साफसफाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी कदम यांनी वापरायोग्य साहित्य त्या मालकाच्या परवानगीनेच घरी आणले होते. या साहित्यांमधील एका पिशवीत बिबट्याचे कातडे व नख्या होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जोतिराम कदम याने बिबट्याचे कातडे व नखे सातारा तालुक्‍यातील एका मच्छीमाराकडे विक्रीसाठी ठेवले होते. सुमारे पंधरा दिवसानंतर ही विक्री न झाल्याने बिबट्याचे कातडे व नख्या कदम यांनी पुन्हा आपल्याकडे घेतल्या होत्या. त्यानंतर हे कातडे व नख्या विक्री करण्यासाठी घेऊन जात असतानाच कदम रंगेहात वन विभागाच्या जाळ्यात अडकला. पाच वर्षापूर्वी बिबट्याची कोठे हत्या झाली? बिबट्याचे कातडे आणि नख्या पुण्यातील त्या दुचाकी शोरूमपर्यंत कशा पोहोचल्या? असे अनेक प्रश्न आता समोर आले असून वनविभाग या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)