बिबट्याचा हल्ल्यांनी मेंढपाळ भीतीच्या छायेखाली

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात देवगाव, काठापूर, लाखणगांव, पोंदेवाडी आदी गावांत बिबट्याचा वाढलेला वावर हा शेतकरी आणि मेंढपाळांसाठी डोकेदुखी ठरत असून, सध्या वारंवार होणाऱ्या हसल्ल्यांमुळे मेंढपाळ वर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे.
आंबेगाव तालुक्‍यात मोठ्‌या प्रमाणावर बिबट्याचा वावर वाढला आहे. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्‌या प्रमाणात असल्यामुळे हा परिसर बिबट्‌याला राहण्यासाठी अनुकूल ठरला आहे. सध्या अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर असून हा बिबट्या वारंवार पाळीव प्राणी आणि मेंढपाळांच्या मेंढ्यांवर हल्ला करत आहे .त्यामुळे मेंढपाळ वर्ग बिबट्याच्या हल्ल्याने त्रस्त झाला आहे. वन विभागाच्या वतीने बिबट्याप्रवण गावांमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत; परंतु बिबट्या मात्र पिंजऱ्यात न अडकता वनविभागालाही हुलकावणी देत आहे. बिबट्या मेंढ्यावर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. वन विभागाच्या वतीने मृत झालेल्या प्राण्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, वारंवार होणाऱ्या हल्ल्याने मेंढपाळ त्रस्त झाला आहे. चाऱ्याच्या शोधात आलेला मेंढपाळ या ठिकाणी होणाऱ्या नुकसानीमुळे “आता जायचं कुठं, हा प्रश्न विचारत आहे. गावाकडे चारा नाही म्हणून हा मेंढपाळ वर्ग आंबेगाव तालुक्‍यातील बागायती गावात आला आहे. येथे होणाऱ्या हल्ल्याने मेंढपाळांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे असून, बिबट्यापासून वाचण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. सध्या मात्र मेंढपाळ आणि शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे त्रस्त झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)