बिबट्याकडून २ शेळ्यांचा फडशा, परिसरात दहशत

संग्रहित छायाचित्र

टाकळी हाजी: फाकटे (ता.शिरूर) येथे बाबाजी रंगनाथ राळे ह्यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून शेळीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. तसेच जांबूत (जोरीलवण) येथे देखील शिवाजी मेरगळ यांची शेळीचा गुरुवारी (दि.9) रात्री नऊ वाजता बिबट्याने फडशा पाडला. वनाधिकारी विठ्ठल भुजबळ यांचे माहितीनुसार, शुक्रवारी (दि.10) सायंकाळी साडेपाचच्या वेळेस बाबाजी हे आपल्या शेळ्या चारून परतत होते. यावेळी दोन्ही बाजूला असलेल्या उसाच्या शेतातून पायवाटेने येताना विलास वाळुंज यांच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून शेळी फस्त केली. तसेच उसाच्या शेतात शेळीला फरफटत नेले.

या घटनेने मेंढपाळ बाबाजी यांनी आरडाओरडा करत मोबाईलवरून लोकांना संपर्क केला. त्यावेळी लोक जमा झाले. त्यांनी उसाच्या शेतात शोध घेऊन शेळी पाहिली असता ती मृत झाल्याचे आढळले. यावेळी चेअरमन वसंत राळे, वनाधिकारी विठ्ठल भुजबळ, डी.डी.फापाळे, एकनाथ वाळुंज, संचालक विलास वाळुंज, नागेश केदारी आणि स्थानिक तरुणांनी मदत केली. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन वनअधिकारी सविता चव्हाण आणि विठ्ठल भुजबळ यांनी केले आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)