बिबटे निघाले घोळक्‍याने, धास्ती धरली बळीराजाने

संग्रहित छायाचित्र...

शिवनेरी- जुन्नर तालुक्‍यातील अनेक गावांतील शिवारात आणि गावात देखील बिबट्याचा वावर असल्याबाबत जोरदार चर्चा आहे. मात्र, हे शिवारांमध्ये फिरणारे बिबटे आता एक-दोन नसून एकाचवेळी चार चार बिबटे आढळून येत असल्याने शेतकरी वर्गासह जनता त्रस्त झाली आहे.
ओतुर, अहिनवेवाडी, चारपडाळी, सारणी, तांबे मळा, ढमाले मळा या भागांत तर आता गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे, तसेच हे बिबटे आता घोळक्‍याने शेतवस्तीवर फिरू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमधे भीतीचे वातावरण आहे.
ओतुर परिसरातील अमिर घाट येथे शुक्रवारी (दि. 22) दुपारी 1 च्या सुमारास मेंढपाळ एका उसाशेजारील शेतात मेंढ्या चारत असताना अचानक बिबट्याने हल्ला करुन एक मेंढी जखमी केली, तर एक मेंढा ठार करून उचलून नेला. यावेळी आरडाओरडा झाल्याने स्थानिक शेतकरी भरत शेटे आणि इतर शेतकऱ्यांनी घटनास्थळी जमा होऊन बिबट्या गेलेल्या दिशेने पाठलाग केला असता त्यांना बिबट्यांचा अक्षरशः घोळकाच दिसला कधी तरी एक-दोन बिबटे किंवा पिल्ले आढळून येत होती. मात्र, आता हे बिबटे असे घोळक्‍याने फिरत असतील तर ही गंभीर बाब असून, या भागातील शेतकरी प्रचंड भयभीत झालेले आहेत.
ही घटना घडल्यावर येथील शेतकऱ्यांनी वनविभागाला हा प्रकार कळविला असता वनविभागाचे विशाल अडागळे, वनमजूर फुलचंद खंडागळे हे घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली असता तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असल्याचे अडागळे यांनी सांगितले.

  • बिबट्यांच्या वावबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज
    या भागात पट्टेरी वाघ असल्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होती मात्र असे वाघ असते तर त्यांनी बिबट्यांनाही आपली शिकार केले असते तसेच जर पट्टेरी वाघ बघीतला असे वाटत असेल तर तरस तो असण्याची शक्‍यता आहे असे वनविभागाकडुन सांगण्यात आले.मात्र चार चार बिबट्यांचे जर घोळके नागरी वस्ती जवळ वास्तव्य करीत असतील तर ही चिंतेची बाब आहे वनविभागाने यावर काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे.शेतकरी व नागरीकांना वनविभागाकडुन जनजागृतीपर सूचना देण्याबाबत देखील विचार व्हायला हवा असे मत जयप्रकाश डुंबरे यांनी व्यक्त केले आहे.
  • बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्याला शेती करणे कठीण जात असून कधीही कोठेही बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या भागात शेतीसाठी मजूर देखील सहजासहजी मिळत नाहीत, असे या वेळी
    – भरत शेटे, शेतकरी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)