बिदाल परिसरातील शेतकरी पेरणी कामात व्यस्त

बिदाल, दि. 14 (प्रतिनिधी) – सध्या परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने बिदालसह परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पेरण्यामध्ये व्यस्त झाला आहे. त्यामुळे शेतामध्ये तसेच शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
शेतात गवताचे साम्राज्य
खरीप पीक कसे घ्यायचे याची चिंतासर्व शिवारात सध्या पेरण्याची लगबग सुरु आहे. बिदाल तसेच परिसरातील गावांमध्ये परतीच्या पावसाने चांगलीच हजेर लावली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पिके काढणीस विलंब झाला. त्याचबरोबर मोठ्या पावसाने पिकांचे अतोनात नुकसानही झाले. पावसामुळे शेतात सर्वत्र गवताचे तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर पहिल्यांदाच त्याचा बंदोबस्त करण्याची समस्या उभी राहिली आहे. मजूर लावून ती स्वच्छता करून खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू असल्याचे चित्र सध्या बिदाल परिसरात पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)