बिदालमध्ये तंबाखूमुक्त कार्यशाळेचे आयोजन

बिदाल : तंबाखू नियंत्रण कार्यक्रमप्रसंगी ग्रामस्थ व शिक्षक. (छाया : प्रकाश राजेघाटगे)

बुध, दि. 3 (प्रतिनिधी) – बिदाल, ता. माण येथील महाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनि. कॉलेजमध्ये येथे सलाम मुंबई फाउंडेशन आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमान तंबाखू नियंत्रण कायदा 2003 च्या कायद्यानुसार तंबाखूमुक्त शाळेचे आयोजन केलेले होते. त्यासाठी बिदालचे सरपंच सौ. गौरी जगदाळे, उपसरपंच सविता कुलाळ, ज्येष्ठ नागरिक, शिवाभाऊ जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य एच. एल. फडतरे, चंद्रकांत ढोक, आबासाहेब जगदाळे, प्रा. सुहास पवार उपस्थित होते. प्राचार्य नांगरे यांनी तंबाखूमुक्त शाळा अभिनयाचे फायदे पटवून दिले. पर्यवेक्षक करांडे यांनी प्रास्ताविक केले. विजय जगदाळे यांनी आभार मानले.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)