बिट चौकीमुळे गुन्हेगारीला आळा बसेल

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 

पारगाव शिंगवे- राज्यातील सरकार हे गतिमान असून येथील नागरिकांनी पोलीस चौकीची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस चौकी बांधण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांचा तातडीने तपास लागेल व गुन्हेगारीला आळा बसेल, असे प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
आंबेगाव तालुक्‍यातील लोणी येथे पोलीस बिट चौकीचे उद्‌घाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील बोलत होते. कार्यक्रमात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस आधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक प्रदिप जाधव, गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णु हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे समवेत अन्य मान्यवर उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले की, परिसरातील कायदा सुवस्था व चोऱ्या रोखण्याची जबाबदारी पोलिसांबरोबरच ग्राम संरक्षक दल, ग्रामस्थ, महिला सुरक्षा समिती व पोलीस पाटील यांची आहे. सुरक्षा समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले पाहिजेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)