बिटकॉईन खंडणी प्रकरणी भाजपच्या माजी आमदाराला अटक

अहमदाबाद: भाजपचे गुजरातमधील माजी आमदार नलिन कोटादिया यांना रविवारी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून अटक करण्यात आली. बिटकॉईन खंडणी प्रकरणी कोटादिया यांना न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी फरार आरोपी म्हणून घोषित केले होते.

सूरतमधील बांधकामव्यवसायिकाकडून काही पोलिस अधिकाऱ्यांनी 9 कोटी रुपयांची खंडणी बिटकॉईनच्या स्वरुपात स्वीकारल्याचे हे प्रकरण आहे. नलिन कोटादिया हे या प्रकरणात वॉन्टेड होते. धुळ्याजवळच्या अंमळनेर येथून त्यांना अटक करण्यात आली, असे अहमदाबादचे डीसीपी दीपन भंडारन यांनी सांगितले. सीआयडीने कोटादिया हे अटक टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे सूरतच्या न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर कोटादिया यांना 18 जून रोजी फरार आरोपी घोषित करण्यात आले होते.

या प्रकरणी आतापर्यंत अमरेली जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जगदिश पटेल यांच्यासह डझनभर पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सूरतमधील बांधकाम व्यवसायिक शैलेश भट यांनी तक्रार दाखल केली होती. अमरेळी येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचे आणि त्यांचे पार्टनर किरिट पालादिया यांचे गांधीनगरमधून 9 फेब्रुवारी रोजी अपहरण केले होते आणि 9 कोटी रुपयांच्या बिटकॉईनची खंडणी वसूल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)