बिटकॉइन खोटा… रूपयाच मोठा…

फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असल्याने ‘ऑनलाईन मनी’तील गुंतवणुकीची ग्रामीण  भागातही धास्ती

पुणे – जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामिण भागात बॅंका, पतसंस्था यासह अन्य अर्थसंस्थांमध्ये मार्च एडिंगमुळे अर्थनियोजनाची जुळवाजुळव सुरू असताना बिटकॉइन सारख्या ऑनलाईन मनी स्किमबाबतही मोठी चर्चा असून हजारोंची गुंतवणूक आणि कोट्यवधी रूपयांचा फायदा, अशी मोठं-मोठ्या आकड्यांची गणितेही मांडली जावू लागली आहेत. शहरांपुरते मर्यादीत असलेले ऑनलाईन मनीचे फॅड आता जिल्ह्यातील शहरापर्यंतही पोहचले आहे. परंतु, बिटकॉइनच्या व्यवहारांत फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढत असून ऑनलाईन मनी मधील गुंतवणुकची धास्ती असून बिटकॉइन पेक्षा आपला खिशात असलेला रूपयांच मोठा… अशी सतर्कता आता महत्त्वाची ठरणार आहे.

जागतिक ऑनलाईन बाजारातील बिटकॉइनचा बोलबाला आपल्याकडे गेल्या दोन ते तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना ग्रामिण भागातील भांडवलदारांसह गरजू गुंतवणुकदारांनाही याची भुरळ पडत असल्याची स्थिती आहे. सध्या, एका बिटकॉइनची किंमत 5 लाख 15 हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. यावरून यातील उलाढालीची कल्पना येवू शकते. विशेष म्हणजे बिटकॉइनसह एमकॅप, इथेरियम, लिटकॉइन अशा प्रकाची सुमारे 80 ते 90 प्रकारची क्रिप्टोकरन्सी अभासी चलनात असल्याचीही चर्चा ग्रामिण भागातील शिक्षित गुंतवणूकदार सर्रास करीत असल्याचे उघड आहे.

मुुंबई, पुणे शहरात अशा प्रकारची गुंतवणूक करण्याचे “ज्ञान’ देणारे “गुरू’ असून एकमेकांच्या ओळखीणे बिटकॉइन किंवा तत्सम ऑनलाईन मनी खरेदी करण्याकरिता ग्रामिण भागातील शिक्षित गुंतवणुकदारांना भुरळ पाडली जात आहे. गेल्या काही महिन्यांत बिटकॉइन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची काही प्रकरणी उघडकीस आल्यानंतर मात्र अशा गुंतवणुकीची धास्ती गुंतवणुकदारांत आहे. विशेष म्हणजे, पुणे शहरातच याचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे.

एक ते दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे 300 ते 400 जणांची सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पुणे शहर तसेच उपनगर पातळीवर आगामी काळात आणखी वाढू शकते, त्यातच जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही अशा प्रकारचे व्यवहार करणाऱ्यांचे जाळे असल्याचे तसेच फसवणूक झाल्याच्याही घटना घडल्या असल्याचे पोलिस दलातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पुणे शहर तसेच परिसरातील अनेकांची गेन बिटकॉइनच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी 22 लाखांची फसवणूक झाली असून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांतील तपासाची व्याप्ती मोठी असल्याने एसआयटीची स्थापना करण्यात आली असून तांत्रिक विश्‍लेषणाकरिता सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
– राधिका फडके, एसआयटी प्रमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पुणे


बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीला आपल्या रिझर्व्ह बॅंकेने परवानगी दिलेली नाही तसेच याबाबत वेळावेळी सावधही केलेले आहे. याची पूर्ण माहिती नसलेल्यांनी तर या फंदातच पडू नये, त्यातून आहे त्या पैशांचे नुकसान होण्याचीच अधिक शक्‍यता आहे. बिटकॉइन हे एक आभासी अर्थजग आहे.
– यमाजी मालकर, अर्थतज्ज्ञ, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)