बिजवडीत द्रक्ष, पपई बागा जमीनदोस्त

बिजवडी- येथील सुमरे 17 एकर वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम आज (गुरुवारी) वनविभागाने राबविली. या कारवाईमध्ये द्राक्ष, पपईच्या बागा, मका पिकांसारखी पिके जमीनदोस्त करण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून इंदापूर तालुक्‍यातील वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बिजावडी येथील वनजमिनीवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत तालुक्‍यातील 10 गावांतील अतिक्रमीत वनक्षेत्र रिकामी करण्यात आली असून, यापुढील काळात मोठी कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग यांनी सांगितले. दरम्यान, सहायक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपरीक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांच्याबरोबर इंदापूर व बारामती तालुक्‍यातील वनपरिमंडल अधिकारी, वनरक्षक व वनमजूर, राज्यराखीव पोलीस बलाची तुकडी, अर्धा डजनाहून अधिक जेसीबी यंत्राच्या साह्याने अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील पिके जमिनदोस्त करण्यात आली. आजच्या कारवाईत सुमारे 17 एकर वनजमिन मोकळी करण्यात आली.
उपवनसंरक्षक लक्ष्मी, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील वनजमिनीचे सर्व्हेक्षण करुन सिमांकण व हद्द निश्‍चित झाल्यानंतर अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील 200 एकराहून अधिक जमिनीची हद्द निश्‍चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वनजमिनीत विविध कारणांसाठी केलेली अतिक्रमणे स्वतःहून काढावीत असे आवाहन, राहुल काळे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)