‘बिग बॉस १२’ चे घर आहे अतिशय मोहक !

बिग बॉसचे नवीनपर्व आज १६ सप्टेंबर पासून होत आहे. या शोचा लॉन्च इव्हेंट मुंबई ऐवजी गोवा येथे झाला होता. त्यामुळे अनेकांना असे वाटत होते की, हा शो मुबई ऐवजी गोवा येथे शूट होणार आहे. परंतु, त्याबाबदला खुलासा आला असून, गोवामध्ये इव्हेंट होण्याचे कारण हे ‘बिग बॉस १२’ चे मोठे घर हे सांगण्यात आले आहे.

यावेळीच्या बिग बॉस १२ चे थीम ‘बीच  हाऊस’ आहे. दरवेळी प्रमाणे या घराचे डिजाईन ओमंग कुमार यांनीच केले आहे. बिग बॉसच्या नवी घराला ३०० लोकांनी २० दिवसात तयार केले आहे.  घराचे इंटेरिअर खूप सुंदर आणि महागडे दिसत आहे. याकडे पहिले की कित्येकदा नैसर्गीक असल्याचे भासते.

-Ads-

या शोमधील कंटेन्सटनच्या यादीनुसार ६ भाग घेत असलेल्या सोबत ६ जोड्या देखील असणार आहेत. जे येथे १०० दिवस राहणार आहेत. बिग बॉसच्या घरात ८९ कॅमेरे लावण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या मोसमात देखील सलमान खान हा शो होस्ट करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)