बिग बॉस फेम ज्योती कुमारीचा मेकओव्हर

बिहारमधून आलेली ज्योती कुमारी यंदाच्या बिग बॉसमध्ये एक सर्वसामान्यांमधली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. बांधलेले केस आणि सूट-सलवार घालून बिग बॉसच्या स्पर्धेमध्ये ज्योती पोहोचली होती. आता मात्र ज्योतीचा लूक पूर्णपणे बदलला आहे.  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीचा मेकओव्हर झालाय. मेकओव्हर झाल्यानंतर ज्योती सुंदर दिसत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये ज्योती मेकअपमध्ये पाहायला मिळाली नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर ज्योतीनं तिच्या लूकवर खास लक्ष दिलं आहे. या फोटोमध्ये ज्योतीनं लाल लिप्सटिक लावल्याचे पाहायला मिळत आहे. या नव्या लूकमुळे ज्योती एवढी वेगळी दिसत आहे की तिला ओळखणेही कठीण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)