बिग बॉसमधून प्रियांक शर्मा बाहेर

बिग बॉसचा यंदाचा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, जसजसा या कार्यक्रमाचा शेवट जवळ येत चाललाय तसतसे अनेक धक्कादायक निकाल समोर येताना दिसत आहेत. शिल्पा शिंदे आणि हिना खान या दोन तगड्या स्पर्धकांनी अजूनही घरात टिकून राहण्यात यश मिळवले आहे.

मात्र, दुसरीकडे हितेन तेजवानी आणि अर्शी खान या संभाव्य विजेत्यांना अचानकपणे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. यावेळी ‘विकेंड का वार’ या स्पेशल एपिसोडमध्येही असाच आणखी एक निकाल पाहायला मिळणार आहे. यावेळी व्होटआऊटसाठी लव आणि प्रियांका यांना नॉमिनेट करण्यात आले होते. त्यामुळे प्रियांकच्या तुलनेत कमकुवत स्पर्धक असणारा लव घराबाहेर जाईल, असा सर्वांचा अंदाज होता.मात्र, प्रत्यक्ष निकाल समोर आला तेव्हा अनेकांना धक्का बसला.

-Ads-

सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या भागात बिग बॉसच्या घरातून प्रियांकला बाहेर जावे लागणार आहे. तर लव त्यागीने पुन्हा एकदा घरातील स्थान टिकवण्यात यश मिळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)