बिग बॉसनं मेघाला दिलं अनोखं बर्थडे गिफ्ट

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कालच्या भागात मेघाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. गार्डन एरियामध्ये केक कापून मेघाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले. त्यानंतर मेघानं ‘बिग बॉसजवळ मर्डर मिस्ट्री’ टास्कमध्ये खुनी  व्हायची इच्छा व्यक्त केली, वाढदिवसानिमित्त बिग बॉसनं तिचीही इच्छा पूर्ण केली. मेघाच्या घरच्यांकडून आलेले काही गिफ्टही मेघाला देण्यात आले. 

सांकेतिक पद्धतीनं खुन करायच्या या टास्कमध्ये पहिला खून पुष्करचा झाला होता. तर आस्तादनं दुसरा खुन रेशमचा केला. त्यानंतर मेघानं भूषणच्या अंगावर पाणी टाकून त्याचाही खुन केला. तर हर्षदाला फ्रुट सलाड भरवलं आणि तिचा खुन केला. जुईचा फोटो लपवून तिचा खुन करण्यातही आस्ताद यशस्वी झाला. अशाप्रकारे घरातील सामान्य नागरिक असलेल्या सदस्यांपैकी बऱ्याच जणांचे खुन झाले आहेत. सुशांत आणि स्मिता हे दोघेही गुप्तहेर असून त्या दोघांना खुनी कोण आहेत हे ओळखता येतं का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)