‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकतीच हर्षदा खानविलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता या बिग बॉसच्या घरात आणखी एका सदस्याची एन्ट्री होणार आहे. हर्षदानंतर आता वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत घरामध्ये प्रवेश करणार आहे.

“आता नक्कीच खूप मज्जा येणार आहे, पण तितकच टेंशन सुध्दा आहे. बिग बॉसच्या घरामध्ये असलेले सगळेच सदस्य माझे मित्र आहेत पण मी माझा स्वतंत्र खेळ खेळणार हे नक्की. मी बिग बॉसची चाहती आहे. या घरामध्ये मी माझा लढा लढेन आणि मीच स्वत:ला हा खेळ जिंकून देऊन शकते. टास्ककडं खूपच मी सकारात्मक दृष्टीनं बघते. मी जशी माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये आहे तशीच मी या बिग बॉसच्या घरामध्ये देखील वावरताना प्रेक्षकांना दिसेन”, असे शर्मिष्ठा राऊत म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)