मराठी बिग बॉसच्या घरात हटके टास्क देण्याचा बिग बॉसचा प्रयत्न असतो. या टास्कमधून युक्ती आणि शक्तीचा योग्य वापर करणं अपेक्षित असतं. परंतु बिग बॉसनं आता केवळ युक्तीचाच वापर होईल, असा ‘मर्डर मिस्ट्री’ हा टास्क दिला आहे. यात स्पर्धकांना आपल्या युक्तीची ‘शक्ती’ दाखवायची आहे. या टास्कमध्ये घरात खून होईल. अर्थात, हा खून खरा होणार नसून प्रतिकात्मक असेल. घरातीलच सदस्यांपैकी कुणीतरी एक खुनी असणार आहे.

सई, जुई, मेघा, पुष्कर, भूषण, हर्षदा, उषा या टास्कमध्ये सामान्य नागरिक आहेत, तर स्मिता आणि सुशांत गुप्तहेर आहेत. आस्ताद हा खुनी असेल. कोणाला तरी रडवणं, कोणाच्या तरी कुटुंबीयांचा फोटो लपवणं अशा प्रकारचे हे प्रतिकात्मक खून होतील. या टास्कमधील यशापयशाचा परिणाम थेट कर्णधार पदाच्या निवडीवर होणार आहे. अपयशी ठरणाऱ्या स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)