बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र दिसणार शिल्पा आणि विकास

बिग बॉसच्या घरी साप्ताहिक बजेट कार्यमध्ये बिग बॉस 11 ची विनर शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता पुन्हा एकदा भांडण करतांना दिसणार आहे. या कार्याचे नाव BB गावातील रांगोली स्पर्धा आहे. या कार्यात शिल्पाच्या टीमला शिंदे कुटूंब हे नाव देण्यात आले आहे. तर विकासच्या टीमला गुप्ता कुटूंब नाव देण्यात आले आहे. यामध्ये एकीकडे घरातील सर्व सदस्य या दोन कुटूंबातील घरासमोर रांगोळी काढतांना दिसले तर दुसरीकडे पुन्हा एकदा बिग बॉस 11 सिझिनमधली शिल्पा आणि विकासचे भांडण प्रेक्षकांना बघायला मिळाले.

दरम्यान, शिल्पाने बिग बाॅस 12 च्या घरातील खलनायक श्रीसंतची प्रशंसा केली. यापूर्वी श्रीसंतला लहान सहान मुद्द्यांवर रडत बसने आणि टास्क अर्धवट करण्याच्या सवयीमुळे सलमानने मागील आठवड्यामध्ये चांगलेच फटकारले होते. इतकेच नाही तर सलमान खानने श्रीसंतच्या खिलाडू वृत्तीवर देखील प्रश्नचिन्ह उठवले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)