‘बिग बॉस’चा ग्रॅंड प्रीमियर होणार धमाकेदार!

प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळालेला ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीत येणार हे निश्‍चित झाल्यापासूनच पुन्हा अजून खूपच चर्चेत आला आहे. 15 एप्रिलपासून कलर्स मराठीवर आपल्या मायबोलीत हा कार्यक्रम झळकणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.  उद्या संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रॅंड प्रीमियर होणार आहे. यावेळी मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार असल्याचे समजते.

महेश मांजरेकर ‘ओ राजे’, ‘दे धक्का’ आणि ‘बिग बॉस’चे सध्या गाजत असलेल्या शीर्षकगीतावर परफॉर्मन्स करणार आहेत. यामध्ये मांजरेकर नवीन अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच ‘बिग बॉस’च्या घरामध्ये नक्की कोण कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना बऱ्याच दिवसापासून होती. ओपनिंगला 15 स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरामध्ये  एन्ट्री करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)