बिग बी कडून रणवीर सिंहला खास भेट

“पद्‌मावत’ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा रोल करणाऱ्या रणवीर सिंहच्या अभिनयाचे स्वतः अमिताभ बच्चन यांनी अगदी हटके अंदाजात कौतुक केले आहे. खिलजीचा क्रूर आणि पातळयंत्री चेहरा रणवीरने पडद्यावर अप्रतिम रंगवला आहे. त्याच्या या रोलमुळे “पद्‌मावत’ला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. आपल्या या भावना व्यक्‍त करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी रणवीरला चक्क हाताने लिहीलेले एक पत्र पाठवले आहे. त्याच्या बरोबर फुलांचा एक गुच्छही पाठवून दिला आहे.

अर्थात या दोन्ही भेटी ट्विटरवर फोटोच्या माध्यमातून पोस्ट केल्या गेलेल्या असल्या तरी रणवीरसाठी ही भेट अगदी अविस्मरणी आणि अचानक मिळालेली होती. रणवीरने ही भेट ट्विटरवरूनच त्याबाबतचा अभिप्रायही पोस्ट केला आहे. “मला माझे ऍवॉर्ड मिळाले’ असे त्याने म्हटले आहे. यापूर्वी “बाजीराव मस्तानी’मधील बाजीरावाच्या रोलसाठीही अमिताभ यांनी रणवीरला हाताने लिहीलेले पत्र पाठवून अभिनंदन केले होते. आता रणवीरकडे अमिताभ यांच्या हस्ताक्षरातील दोन पत्रे आहेत, हे त्याच्यासाठी निश्‍चितच एखाद्या ऍवॉर्डसारखे असणार यात शंका नाही. आश्‍चर्य म्हणजे

-Ads-

“बाजीराव मस्तानी’मधील “पिंगा पिंगा’बद्दलही वाद झाला होता आणि त्याही सिनेमामध्ये रणवीरबरोबर दीपिका पदुकोण होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)