बिग-बींनी दिला तरुणपणीच्या आठवणींना उजाळा

दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांच्या शुटींगसाठी गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथे  दिग्दर्शक नागराज मंजुळेसह बिग-बी सुद्धा तळ ठोकून आहेत. या दरम्यान बिग-बी यांनी नागपूर परिसरात काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. या पोस्टमध्ये चक्क बैलगाडीचा आनंद घेत त्यांनी आपल्या गावाकडच्या आठवणींना पुन्हा एकदा अनुभवल्याचे सांगितले आहे. तसेच कॉलेज काळातील बसचा प्रवास अनुभवल्याचे फोटो शेयर केले आहे.

‘झुंड’ या चित्रपटामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारते या विषयी कथानक साकारण्यात येणार आहे. मराठीत ‘सैराट’ हा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे आणि भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यवर्ती असलेले नागपूरसारखे आकर्षण केंद्र अशी दोन आकर्षण केंद्रे एकत्र आल्याने काहीतरी वेगळे पाहायला मिळेल, असा विश्वासही अमिताभ यांनी सोशल माध्यमातून यापूर्वी व्यक्त केला होता.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)