एनबीएफसी क्षेत्र म्हणजेच बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थेत रोख रकमेच्या कमरतेचा परिणाम रिअल इस्टेट सेक्टरवर होत आहे. सध्याची स्थिती एवढी नाजूक बनली आहे की, कोणत्याही प्रकारची एनबीएफसी बॅंक ही 30 ते 40 कोटी रुपयाचा धनादेश देण्यास तयार नाही. एवढेच नाही तर एनबीएफसीकडून रिटेल कर्ज देण्यासही अडचणी येत आहेत. रोख रकमेच्या टंचाईमुळे गृहकर्जाचा व्याजदर वाढले आहे.
एनबीएफसी क्षेत्रात रोख रकमेच्या कमरतेमुळे आय.एल. अँड एफ.एस समूहाच्या अनेक कंपन्यांकडून कर्जाची परतफेड करण्यास कुचराई केली गेली. परिणामी म्यूच्युअल फंड आणि अन्य वित्तीय कंपन्यांची कमर्शियल पेपरच्या माध्यमातून गुंतवणूक थांबली आहे. विशेष म्हणजे गुंतवणुकीचे हे माध्यम एनबीएफसीसाठी फंड गोळा करण्याचे मोठे साधन राहिले आहे. सध्या बाजारातील अंदाजित 50 हजार कोटी रुपये एवढे कमर्शियल पेपरची भरपाई करणे बाकी असल्याने धास्तीचे वातावरण आहे.
– जगदीश काळे
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा