बिगबी-अभिषेकनी अनुभवला फिफाचा थरार

रशियात सुरु असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2018 सामन्यांची रंगत अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या जगभरात फुटबॉल फिव्हर पसरू लागला आहे. याला बॉलीवूड कलाकारही अपवाद नाहीत. बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी तर थेट रशिया गाठली असून उपांत्य फेरीतील फ्रान्स- बेल्जियम सामन्याचा त्यांनी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये उपस्थित राहून थरार अनुभवला.

ज्युनिअर बच्चनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सेंट पिटर्सबर्ग येथे फ्रान्स विरुद्ध बेल्जियम यांच्या सामन्याचा दोघांनी एकत्रित आनंद लुटला. हा सामना जिंकून फ्रान्सने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता त्यांची अंतिम लढत क्रोएशिया यांच्याशी होणार आहे.

अभिषेकला फुटबॉल मनापासून आवडतो आणि तो एका फुटबॉल क्‍लबचा मालक आहे. त्याचप्रमाणे त्याने कब्बडी लीगमध्येही एक संघ खरेदी केला आहे. बिग बी आणि अभिषेक लंडनमध्ये श्वेता आणि नात नव्या यांना भेटायला गेले होते. तेथूनच त्यांनी सरळ रशियाला प्रयाण केले असे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)