बिकेबीन रस्त्यावर झाडामुळे अपघाताला निमंत्रण

डोर्लेवाडी- बारामती वालचंदनगर या बिकेबीएन रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे वाहनचालकाला अपघाताला निमंत्रण देत आहेत. बारामती वालचंनगर हा बिकेबीएन रस्ता शिखर शिंगणापूर व पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. यामुळे या रस्त्यावर कायमच वर्दळ असते. मात्र गेल्या एक आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक झाडे उन्मळून पडली. ती झाडे बांधकाम विभागाने मशीनच्या सहाय्याने कापुन नेली मात्र वाकलेली झाडे आहे त्याच स्तिथीत असल्याने वाहन चालकाला ती झाडे अपघाताला निमंत्रण देत आहेत. अपघाताला निमंत्रण देत असलेली झाडे बांधकाम विभाग एखाद्याचा बळी गेल्यानंतर काढणार का असा प्रश्‍न वाहनचालक आणि नागरिकांनी केला आहे. तसेच या रस्त्यावर अनेक वाकडी वळणे असल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालवताना या वळणाचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. यामुळे या रस्त्यावरती रिफ्लेक्‍टर बसवण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)