बिएसएनएलची केबल चोरली   

पुणे – भारत संचार निगम लिमीटेड कंपनीचे केबल चोरल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले. डेक्कन पोलीसांनी ही कारवाई केली.

राजसिंग युवराजसिंग ज्युनी(22), अरुणसिंग चंदासिंग भोंड(19, रा.पाटील इस्टेट झोपडपट्टी, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी अर्जुन धुमाल (59, रा.माणिकबाग) हे बीएएनएलमध्ये उप अभियंता पदावर कार्यरत आहेत. महापालिकेने संत तुकाराम पादुका चौकात केलेल्या खोदकामामुळे त्यांच्या कंपनीचे टेलिफोनची केबल उघडी पडली होती. सुमारे 8 ते 10 मीटर लांबीची दहा हजार रुपये किंमतीची ही केबल आरोपींनी चोरुन नेली होती. ही केबल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए.एम.खरात तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)