बिंदूनामावली नोंदणीकडे पाठ

पुरेसा प्रतिसाद नाही; तिसऱ्यांदा मुदतवाढ : 114 संस्थांकडूनच नोंद

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलवर केवळ 114 शिक्षण संस्थांनीच बिंदूनामावलीची नोंदणी केली आहे. नोंदणी करण्यास संस्थांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता नोंदणीसाठी पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात येणार आहे.

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये 20 हजार शिक्षक भरतीच्या जागा रिक्त आहेत. शासनाने पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्याची घोषणा केली असून त्यासाठी पवित्र पोर्टलही सुरू केले आहे. या पोर्टलवर 1 लाख 78 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीनंतर महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शिक्षण संस्थांना बिंदूनामावली नोंदविण्यासाठी 3 ते 19 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत केवळ 12 खासगी संस्थांनीच नोंदणी केली होती. या मुदतीत संस्थांकडून नोंदणीसाठी फारसा काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने शासनाने नोंदणीसाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीत एकूण 114 शैक्षणिक संस्थांनी बिंदूनामावलीची नोंदणी केली आहे. यात मराठी माध्यमासाठी 111, इंग्रजी माध्यमाच्या 2, सिंधीच्या 1 अशा संस्थांचा समावेश आहे.

दुसऱ्यांदा मुदतवाढ देवून अद्याप बऱ्याचशा संस्थांनी बिंदूनामावलीची नोंदणी केलेली आढळुन येत नाही. त्यामुळे आता शासनाकडून पुन्हा नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे.

भरती रखडण्याची शक्‍यता
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यास राज्यातील बहुसंख्य खासगी संस्थांचा तीव्र विरोध आहे. काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिक्षक भरतीसाठी संस्थांकडून पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास ही भरतीच रखडण्याची जास्त शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)