बिंदूनामावलीच्या नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ

पुणे – राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलवर बिंदूनामावलीची (रोस्टर) नोंदणी करण्यासाठी शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांना आता 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा पारदर्शकपणे भरण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर शासकीय व खासगी शैक्षणिक संस्थांच्या बिंदूनामावलीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्यांदा 3 ते 19 ऑक्‍टोबर असा नोंदणीसाठी कालावधी निश्‍चित केला होता. या कालावधीत केवळ 12 खासगी संस्थांनीच नोंदणी केली होती. त्यानंतर 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीत 114 संस्थांनी नोंदणी केली आहे. बहुसंख्य शासकीय संस्थांबरोबरच खासगी संस्थांनीही अद्याप नोंदणी केलेली आढळून येत नाही. आणखी संस्थांनी नोंदणी करावी, यासाठी आता 15 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)