बाहुलीसारखं दिसण्याचा ‘जीवघेणा’ अट्टाहास

सौंदर्य हे मानवाला मिळालेलं निसर्गदत्त वरदान असतं, असं म्हटलं जातं. हे वरदान लाभलेले असंख्य जण सभोवतालच्या परिसरावर मोहिनी घालत असतात. मोनालिसा, मधुबाला यांच्या सौंदर्यानं तर लाखो जणांना स्तीमित केलं. तसं पाहिलं तर सौंदर्याचं वेड मानवाला अनादी काळापासून आहे. प्राचीन काळाचा वेध घेण्यासाठी झालेल्या उत्खननातूनही याबाबतचे अनेक पुरावे समोर आले आहेत. पूर्वीच्या काळी राजवाड्यांमध्ये राजांच्या, राणीच्या सौंदर्यासाठी असंख्य प्रकारचे उपाय केले जात होते. बदलत्या काळात आरोग्यक्षेत्रात प्रगती झाली आणि सौंदर्य शस्रक्रियांचा जन्म झाला.

अलीकडील काळात सेल्फीमध्ये चेहरा चांगला दिसावा यासाठी ओठांवर आणि अन्य चेहऱ्यावर शस्रक्रिया करून घेतल्या जातात हे ऐकलं असेल आणि ते वाचून आश्‍चर्यही व्यक्‍त केलं असेल ना ! सिनेसृष्टीतील नायिकाही हल्ली अशा शस्रक्रिया मोठ्या प्रमाणावर करून घेतात. हे झालं भारतातलं ! युक्रेन किंवा अन्यही देशांमध्ये बार्बी डॉलप्रमाणे दिसण्यासाठी अनेक तरुणी चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करीत असतात. फिनलॅंडमधील एका वेबकॉम मॉडेलने बार्बीसारखी दिसण्यासाठी संपूर्ण शरीरावरच तब्बल 15 शस्त्रक्रिया केल्या.

-Ads-

एवढ्या शस्त्रक्रियांमुळे तिच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली असून सध्या ती मृत्युशय्येवर असल्याची चर्चा आहे. अमांडा अहोला (वय 21) असे तिचे नाव आहे. अमांडाने बार्बीसारखे दिसण्यासाठी 19,000 युरो (15 लाख रुपये) खर्च केले आहेत. तिसर्या शस्त्रक्रियेनंतर तिची तब्येत ढासळण्यास सुरुवात झाली. तिच्या मेंदूला सूज आली असून त्याचा परिणाम इतर अवयवांवरही होत आहे. तिला वाचवण्यासाठी डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी तिने सोशल साईटवर आपली तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती.

तसेच आई-वडील व बॉयफ्रेंडला मी शस्त्रक्रिया करून घेणं आवडत नाही. पण बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी मी वाटेल ते करू शकते, असं अमांडाने म्हटलं होतं. अमांडा आपल्या कुटुंबापासून विभक्त राहते. या शस्त्रक्रियांसाठी तिने मिळेल ते काम करून युरो जमवले आहेत. वेबकॉम मॉडेल होण्याआधी तिने एका हॉटेलमध्ये सफाई कर्मचारी म्हणूनही काम केले होते.

सतीश जाधव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)