बाहुलीच्या चेहऱ्याची ‘बाहुबली’

रशियाची युवा वेटलिफ्टर सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. टिनेजर असलेल्या या वेटलिफ्टरचा चेहरा निरागस बाहुलीसारखा दिसतो. मात्र, तिचे मसल्स एखाद्या कसलेल्या मल्लासारखे आहेत. ज्युलिया विन्स असे या 20 वर्षीय रशियन वेटलिफ्टरचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिला “मसल्स बार्बी’ या नावाने ओळखले जात असून, तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ज्युलिया वेटलिफ्टिंग करते. म्हणजेच तिने वयाच्या 15 व्या वर्षी वेटलिफ्टिंगला सुरुवात केली.

यू ट्यूबवरील एका व्हिडीओत ज्युलिया म्हणते की, ज्यावेळी मी 15 वर्षांची होते, तेव्हा मला आयुष्यात काही तरी करावे लागणार असे वाटत होते. त्यावेळी मी प्रत्येक बाबतीत असमाधानी होते. कारण, मी शरीराने अत्यंत कृश होते. यामुळेच मनाने मी बलशाली व मजबूत होण्याचा निर्णय घेतला आणि वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कठोर परिश्रम आणि काही तरी करून दाखवण्याची जिद्द, याचे फळही ज्युलियाला लवकरच मिळाले. 2016 मध्ये मॉस्कोत झालेली वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप तिने जिंकली. या स्पर्धेत तिने तीन नव्या विश्वविक्रमांची नोंद केली. या कामगिरीने इतरांना प्रेरणा मिळत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)