बास्केटबॉल स्पर्धा : दस्तूर, आयडियल, शार्प शूटर्स, ऑल स्टार्स यांची उपान्त्य फेरीत धडक 

स्व. संजय निम्हण स्मृती जिल्हा निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धा 
डेक्‍कन जिमखाना अ, मिलेनियम यांची दोन्ही गटांमध्ये आगेकूच 

पुणे – दस्तूर व आयडियल या संघांनी मुलींच्या गटांत, तर शार्प शूटर्स, ऑल स्टार्स या संघांनी मुलांच्या गटांत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना स्व. संजय निम्हण स्मृती जिल्हा निवड चाचणी बास्केटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. डेक्‍कन जिमखाना बास्केटबॉल संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत डेक्‍कन जिमखाना अ आणि मिलेनियम या संघांनी मुले व मुली अशा दोन्ही गटांमध्ये उपान्त्य फेरी गाठली. सातारा येथे जूनच्या पहिल्या आठवड्यांत होणाऱ्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेसाठी या स्पर्धेतून पुणे जिल्ह्याच्या संघांची निवड करण्यात येणार आहे.
मुलींच्या गटातील पहिल्या उपान्त्यपूर्व लढतीत सरदार दस्तूरने एसपीएम अ संघाचा 38-25 असा 13 गुणांनी पराभव केला. वैष्णवी शिंदे व पलक पालरेचा यांनी प्रत्येकी 8 गुणांची नोंद करताना दस्तूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून आदिती शाहने 8, तर अस्मी व्होराने 7 गुण नोंदवीत झुंज दिली. मध्यंतराला विजयी संघाकडे 18-10 अशी आघाडी होती.

मुलींच्या गटातील दुसऱ्या लढतीत आयडियलने चोंधे पाटील अकादमीचा 39-30 असा 9 गुणांनी पराभव केला. ओशिन अजनीकर (19) आणि जाई कालेकर (11) यांनी आयडियलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर मानसी निर्मलकर (19) आणि वेदांती नहाणे (6) यांनी पराभूत संघाकडून लढत दिली. मध्यंतराला विजयी संघाकडे 26-17 अशी आघाडी होती.

मुलींच्या तिसऱ्या लढतीत डेक्‍कन जिमखाना अ संघाने सेंट जोसेफचा 49-31 असा पराभव केला. मध्यंतराला विजयी संघाकडे 15-10 अशी आघाडी होती. शालिनी शिंदे व युक्‍ ता चोरडिया यांनी प्रत्येकी 12 गुणांची नोंद करताना डेक्‍कनच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून राजनंदिनी निंबाळकरने 17 व रितिका जाधवने 8 गुण नोंदवीत लढत दिली.

मुलींच्या चौथ्या सामन्यात आत्मजा दाणी (11) व रेवा रावत (7) यांच्या कामगिरीमुळे मिलेनियम स्कूलने डेक्‍कन जिमखाना ब संघाचा 22-16 असा पराभव केला. श्रेया उपाशीने 10 गुण नोंदवीत डेक्‍कनकडून लढत दिली. मध्यंतराला मिलेनियमकडे 8-3 अशी आघाडी होती. मुलांच्या गटातील उपान्त्यपूर्व सामन्यात मध्यंतराला 31-33 असे पिछाडीवर असलेल्या डेक्‍कन जिमखाना अ संघाने मिसचिफ मेकर्स अ संघाचा 89-84 असा पराभ” करीत उपान्त्य फेरी गाठली. ओजस आंबेडकरने 38, तर राजू सिंगने 21 गुणांची नोंद करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. मिसचिफकडून कैफ काझीने 22 व आर्य इतक्‍यालने 19 गुण नोंदवीत कडवी झुंज दिली.

मुलांच्या गटातील अन्य उपान्त्यपूर्व लढतीत मिलेनियमने मिसचिफ मेकर्स ब संघाचा 31-27 असा पराभव केला. तर शार्प शूटर्सने गुरू नानक पब्लिक स्कूलला 44-21 असे नमवीत उपान्त्य फेरीत धडक मारली. अखेरच्या लढतीत ऑल स्टार्सने पीवायसीला 44-27 असे पराभूत करीत उपान्त्य फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)