बावनकशी नेतृत्व : नितीन बानुगडे-पाटील

शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन बानुगडे-पाटील यांच्यावर अनेक महत्त्वाची पदे सोपवली. त्या सर्वा पदांचं आपल्या कार्यशैलीने सोने करणाऱ्या बानुगडे-पाटील यांची महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) यांची निवड झाली. यामुळे ना. बानुगडे-पाटलांचे बावनकशी नेतृत्व आणखीन झळाळून उठले आहे. त्यांच्या निवडीनिमित्त…

सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेल्या नितीन बानुगडे-पाटील यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी. मुलावर संस्कारांचे बीज रुजवत असतानाच लहान नितीन यांच्या अंगचे वक्तृत्व गुण ओळखले. शालेय जीवनापासून सुरु झालेला बानुगडे पाटील नावाचा वाणीचा प्रवास अवघ्या मराठी मुलखाच्या मनामनात पोहोचला. हे करत असताना त्यांनी भौतिकशास्त्र विषय घेऊन एम. एस्सी. बी. एड. पदवी प्राप्त केली व रहिमतपूरमधील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परंतु यामध्ये त्यांचे मन जास्त काळ रमले नाही. त्यांनी सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सोबतीला घेऊन वंदेमातरम आणि शंभूराजे महानाट्याची निर्मिती केली. लेखक-दिग्दर्शक-निर्माता या भूमिकेत या महानाट्याचे राज्यभर प्रयोग झाले.

-Ads-

वक्तृत्वाची ही मुलुख मैदानी तोफ महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर धडाडत असतानाच राजकीय पक्षाच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. अनेक पक्षधुरिणांनी भेट घेऊन पक्षात येण्याचा आग्रह केला. परंतु, बानुगडे-पाटील यांनी विनम्रपणे नकार दिला. तथापि, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवरायांना अभिप्रेत स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी भगवा खांद्यावर घेतला पाहिजे, असे सांगत त्यांच्या हाती भगवा दिला. त्यांनी तो नुसताच खांद्यावर घेतला नाही तर वाडीवस्तीपर्यंत भगवा आणि स्व. बाळासाहेबांचा विचार पोहचवला. सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याचे कृतिशील उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राबवले. राजकारणाचा वारसा घरात नसताना बानुगडे-पाटील यांनी समाजकारण करत पक्षाच्या चिन्हावर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर उमेदवार उभे केले व चांगली मते घेतली.

आज कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद बानुगडे-पाटील यांना मिळाले आहे. उपनेते असलेले बानुगडे-पाटील आज नामदार झाले आहेत. हा बहुमान सातारा-सांगली जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांचा आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसैनिकांमध्ये बारा हत्तीचे बळ निर्माण होणार आहे. ना. नितीन बानुगडे पाटील यांना निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीस शुभेच्छा!

– किरण भोसले,
तालुका प्रमुख कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)