बावधन येथे एकाची आत्महत्या

वाई, दि. 4 (प्रतिनिधी) – बावधन, ता. वाई येथील शिवाजी लक्ष्मण राजपुरे (वय 56) सध्या रा. बावधन, ता. वाई, यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत मुलगा दत्तात्रय शिवाजी राजपुरे रा. बावधन यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी की, गुरूवार, 4 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान शिवाजी राजपुरे यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. अधिक तपास पोलिस नाईक ए.बी. चव्हाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)