बावडाच्या तंटामुक्‍तच्या अध्यक्षपदी घोगरे

बावडा- बावडा गावच्या तंटामुक्‍त गाव समितीच्या अध्यक्षपदी आज (शनिवारी) तुकाराम हनुमंतराव घोगरे यांची गणेशवाडी येथे झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. गणेशवाडी (बावडा) येथे सरपंच किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत प्रारंभी इतर सर्व विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यानंतर ग्रामसभेमध्ये माजीमंत्री हर्षवर्धन पाटील व अशोक घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तंटामुक्‍त समितीच्या अध्यक्षपदी तुकाराम घोगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामसभेत नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी तुकाराम घोगरे यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी सूचना मांडली.या सूचनेस महादेव कांबळे यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष तुकाराम घोगरे यांचा सरपंच किरण पाटील यांच्या हस्ते ग्रामसभेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी पंचायत समितीचे सदस्य अशोक घोगरे, बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, ग्रामसेवक भागवत नागापुरे व मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)