बाळुबाई देवस्थानला क वर्ग दर्जाने विकासाला चालना

डॉ. येळगावकर : उंबर्डेत दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार

वडूज, दि. 18 (प्रतिनिधी) – उंबर्डे, ता. खटाव येथील बाळुबाई देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळाल्यास देवस्थानच्या व गाव परिसराच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे मत माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केले.

उंबर्डे येथे दहावी, बारावी परिक्षेत उज्वल यश मिळविलेल्या गावपरिसरातील विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत नावलौकीक कमविलेल्या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. माजी पंचायत समिती सभापती संदिप मांडवे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, तालुकाध्यक्ष विकल्प शहा, कराड मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष सुरेशराव पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक, तालुका क्रिडा अधिकारी बळवंत बाबर, अभिजीत येळगावकर, माजी सरपंच सयाजीराव पवार, सरपंच सौ. पुष्पलता गलंडे, उपसरपंच हणमंत पवार, चंद्रकांत पवार, आनंदराव पवार, शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल पवार, सौ. किशोरी पाटील, अनिल माळी, डॉ. चैतन्य ठोके, डॉ. सौ. राजश्री ठोके, सुशिल तरटे, मकरंद जोशी, राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आराध्य दैवत बाळुंबाई देवस्थानला तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळाल्यास अनेक विकासकामे मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. नामवंत मल्ल (कै.) वामनराव पवार यांच्या स्मृतीस चालना देण्यासाठी कुस्ती आखाडा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, गावच्या विकासाला आपले कायम सहकार्य राहील, असेही येळगावकर म्हणाले.

मांडवे, देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद जगदाळे यांनी सुत्रसंचालन केले. निलेश पवार यांनी स्वागत केले. सौ. अनिता पवार यांनी आभार मानले.

तात्यासाहेब पवार, संभाजी पवार, ऍड. दत्तात्रय पवार, डॉ. नारायण जाधव, सर्जेराव जाधव, अधिक पवार, सुरज भांडवलकर, बाळासाहेब पवार, धनाजीराव पवार, प्रल्हाद पवार, राजाराम पवार, अश्विनी पवार, संगिता पवार, संदिप पवार, रत्नमाला पवार, विनोद खाडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)