बाळासाहेब सोळस्कर यांची राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मुंबई ः राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बाळासाहेब सोळस्कर यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करताना खा. शरद पवार.

पिपोंडे, दि. 7 (प्रतिनिधी) – सोळशी ता. कोरेगांव येथील व मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर यांची राष्ट्रवावादी कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली . या निवडीचे पत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी त्यांना दिले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विश्वासु म्हणुन सोळस्कर यांची ओळख आहे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ना. रामराजे नाईक -निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले सोळस्कर यांच्या निवडीमूळे आगामी निवडणुकीसाठी त्यांचा फायदा होणार आहे. यापुर्वी बाळासाहेब सोळस्कर यांनी विविध सहकारी संस्थावर काम केले आहे. तसेच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामधील गाढा अभ्यास आहे
या निवडीबद्दल त्यांचे पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, ना. रामराजे नाईक निंबाळकर, प्रदेशअध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी उपमुख्यंमंत्री आ. अजित पवार, विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, खा. उदयनराजे भोसले, खा. विजयसिंह मोहिते पाटील, खा. सुप्रियाताई सुळे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, नितीनकाका पाटील, सुनिल माने, संजय झवर, अरूण माने, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, शिवाजीराव महाडिक, राजु भोसले, कांतीलाल पाटील, सुरेश साळुंखे, जि. प. सदस्य मंगेश धुमाळ, डॉ. अभय तावरे, सतीश धुमाळ, लालासाहेब शिंदे,उपसभापती संजय साळुखे, नितीन भरगुडे पाटील, बाळासाहेब भोईटे, संभाजीराव धुमाळ, संजय धुमाळ, शिवाजीराव पवार, भुषण पवार, तानाजीराव शिंदे, नागेश जाधव, विकास साळुंखे, दत्तात्रय धुमाळ, शकिला पटेल, शाहुराज फाळके, दत्तात्रय भोईटे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)