बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम लवकरच 

उद्धव ठाकरे शनिवारी घोषणा करणार 

मुंबई: केंद्र सरकार जबाबदारी घेत नसेल तर शिवसेना अयोध्येत जाऊन राम मंदिर बांधेल, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आधी बाळासाहेबांचे स्मारक बांधा अशी टीका करणाऱ्या विरोधकांना आता लवकरच उत्तर मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामाची घोषणा उद्धव ठाकरे शनिवारी करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनांतर शिवाजीपार्क येथील महापौर निवासस्थानी त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. हे स्मारक राज्य सरकार उभारणार असून त्यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. महापौर निवास हे हेरिटेज वास्तू असून ते समुद्र किनाऱ्याजवळ आहे. त्यामुळे स्मारकासाठी आवश्‍यक असलेल्या परवानग्या रखडल्या होत्या. या स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्याने स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली.

महापौर निवास हेरिटेज वास्तू असल्याने त्याची कोणतीही तोडफोड न करता या वास्तूमध्ये शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडवून दाखवणार आहे. त्यासाठी खास थ्रीडी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असल्याचे समजते. त्यासाठी महापौर निवासात वेगवेगळे दालन केले जाणार आहे. तसेच महापौर निवासाच्या प्रांगणात शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला बगिचा उभारला जाणार असून त्यांना आवडणारी फुलझाडे, औषधी झाडेही लावणार आहे. त्याचबरोबर हे स्मारक कशाप्रकारे बांधले जाणार आहे, याची इंत्यभूत माहिती उद्धव ठाकरे शनिवारी महापौर निवासात पत्रकार परिषदेत देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)