बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

सातारा ः स्व. बाबासाहेब ठाकरे जयंती दिवशी वनवासवाडी शाळेतील मुलांना खावू वाटप करण्यात आला. (छाया ः संजय कारंडे)

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बुधवारी सातारा तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना शाखा, वनवासवाडी येथे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वनवासवाडी अंगणवाडी शाळा, जिल्हा परिषद मराठी शाळा क्र. 1 व क्र. 2 येथील विद्यार्थ्यांना फळे व मिठाईचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी सातारा उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, डॉ. जितेंद्र देशपांडे, शिवसेना विभागप्रमुख संजय गायकवाड, संजय कारंडे, प्रतीक शेडगे, शाखाप्रमुख संतोष जाधव, बुथप्रमुख वसंत जाधव, अभिजित मापारी, सुरेश रिटे, संपतराव बोराटे, संतोष कुंभार, सुरेखा वर्णेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका तसेच इतर शिवसैनिक समाजातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)