राजगुरूनगर-स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आपली प्रेरणा आणि ताकद आहे, असे प्रतिपादन खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी राजगुरुनगर येथे केले.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने शिवसेना खेड तालुका मुख्य कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन करण्यात आले. खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश चव्हाण, शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख विजया शिंदे, शिवसेना जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ग्राहक सेलचे लक्ष्मण जाधव, माजी उप नगराध्यक्षा सारिका घुमटकर, शेतकरी सेना तालुका प्रमुख एल. बी. तनपुरे, शिवसहकारचे जिल्हा प्रमुख शंकर दाते, उपतालुकाप्रमुख संतोष वाळुंज, महेंद्र घोलप, शहरप्रमुख सुनील टाकळकर, देवराम वाडेकर, विभागप्रमुख दत्ता भांबुरे, शिवसेना शाखाप्रमुख कैलास गोपाळे, निलेश वाघमारे, अशोक वाळुंज, आकाश बोंबले, महिला आघाडीच्या संगिता तनपुरे, मंगल माकर, बाळासाहेब येवले, कुमार ताजवे, जमाल शेख यांच्यासह खेड तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. आमदार गोरे म्हणाले, देशातील जनतेमध्ये हिंदुत्व जागृत केले म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट पदवी जनतेने बहाल केली. पदाची अपेक्षा न ठेवता अनेक माणसे घडवली. मराठी माणसात जागृती करण्याची ताकद त्यांच्या शब्दांत होती. राज्यात मराठी माणसाला त्यांना सर्वोच्च मान निर्माण करून दिला. समाजाला प्रभावित करणारे विचार त्यांनी दिले. शिवसेना पक्ष त्यांच्या विचारांवर उभा आहे. शिवसैनिक म्हणून आपण त्यांचे विचार समाजात पोहविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर म्हणाले, हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे राज्यात शिवशाही निर्माण केली. त्यांनी खेड तालुक्यात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. एक करारी आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारा असा नेता होते. तालुक्यात त्यांची 2004 साली झालेली सभा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी होती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा