बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी 6, 1812; पोंभुर्ले – मे 18, 1846) हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. जांभेकरांनी बालपणी घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. सन 1825 मध्ये मुंबईस येऊन ते सदाशिव ऊर्फ बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्‍ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले.

गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्‍ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. सन 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले ऐतद्देशीय व्याख्याते म्हणून त्यांची नियुक्‍ती झाली. त्यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराथी, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)