बाल लैंगिक अत्याचाराचा कोवळ्या मनावर आघात

गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ 


रोखण्यासाठी पालक, समाजात जनजागृती गरज

पुणे – “मुले म्हणजे देवाघरची फुले’ या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये सद्या समाजात घडत आहे. वासनांध आणि विकृत व्यक्तींकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे मुले बळी पडत आहेत. निरागस, कोवळ्या जीवाच्या शोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे.
नुकतेच हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री डेझी इराणी यांनी त्यांच्यावर वयाच्या सहाव्या वर्षी अत्याचार झाल्याचे 60 व्या वर्षी उघड केले. सहा वर्षांच्या असताना “हम पंछी है एक डाल के’ या चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना त्यांच्यावर अत्याचार झाला होता. त्यांचे कौटुंबिक संबंध असलेल्या एका व्यक्तीने तत्कालिन मद्रासमध्ये हे कृत्य केले होते. परंतु, आपल्यासोबत काय झाले हे आईला सांगण्याची हिंमत त्यांनी केली नाही. त्यामुळे ही गोष्ट 60 वर्ष गुपीत राहिली होती.

लैंगिक शोषणाविषयी लहान मुलांना पालकांनी व्यवस्थित माहिती देने गरजेचे आहे. अनेकदा लहाण मुलांना कोण कसे वागायचे कसे नाही याबाबत पालक माहिती देत नाहीत, त्यामुळे असे प्रकार घडतात. मुला-मुलींच्या वागण्यात फरक जाणवताच पालक त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये घेऊन येतात. अत्यंत घाबरलेल्या आवस्थेत ही मुले आसतात. मुलींपेक्षा मुलांच्या शोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आम्ही शाळांमध्ये जाऊन याविषयी माहिती देतो. पीडित मुला-मुलींना पोलीस तक्रार देण्यापासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत आम्ही सोबत देतो. – अंजली पवार, संचालक, सखी संस्था

सध्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर मोठ्या प्रमाणावर बाल कलाकार दिसून येतात. या माध्यमातून त्यांच्या टॅलेंटला वाव मिळतो. मात्र, असे असतांना त्यांच्या सुरक्षेकडे त्यांच्या आप्तस्वकिय आणि आई-वडिलांकडून दुर्लक्ष होते. अशा प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी आपली आपबिती जगासमोर उघड केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही घटना कथन केली आहे.

काही वेळी मुलांकडून भितीपोटी पालकांना या प्रकारांबाबत माहिती दिली जात नाही; तर काही प्रकरणात पालकही बदनामी होण्याच्या भीतीपोटी उघड करण्यास घाबरतात. आजची पिढी म्हणजे उद्याचे भविष्य, असे म्हटले जाते; मात्र उद्याचे भविष्य असलेल्या पिढीला आपण आज काय देतो आहोत, याचा विचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या कळण्याच्या, उमलण्याच्या वयात त्यांच्यावर नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडून लैंगिक अत्याचार होत आहेत. त्यामुळे त्यांची कोवळी मने कोमेजून जातात. लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, अशा प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी “बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा’ तयार करण्यात आला आहे.

तसेच, या प्रकरणांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. बाल लैंगिक अत्याचाराचा 2012 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे सर्वसामान्य न्यायालयात इतर खटल्यांसह न चालविता जलदगतीने निकाली निघावा यासाठी पुणे जिल्हा कोर्टात 11 मार्च 2012 रोजी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधकासाठीचे विशेष न्यायालय सुरू केले आहे. मात्र, असे असूनही लज्जेखातर पालक गुन्हे दाखल करण्यास धजावत नसल्याचेही पुढे आले आहे.

संस्था आणि शाळांतून या विषयासंदर्भात काय करता येईल ?
पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन
पालक व शिक्षकांच्या कार्यशाळा.
शाळेतील मुलांना “वैयक्तिक सुरक्षे’ अंतर्गत बोलते करणे. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श या बद्दल जागरूकता निर्माण करणे. या संवादांतर्गत एखाद्या मुलाने आणि मुलीने जे काही सांगितले त्यातून त्याचे/तिचे शोषण होत आहे हे पुढे आले तर परिस्थितीनुसार ते पालक व शिक्षकांच्या निदर्शनास आणून देणे.

लैंगिक अत्याचाराचा लहान मुलांवर परिणाम
अत्याचाराचा मुलांवर परिणाम कमी किंवा जास्त होऊ शकतो
शारीरिक जखमा जसे ओरखडे, चावे, चिरा, गुप्तांगातून रक्त येणे किंवा आणखी इतर जागी शारीरिक जखमा.
मुले भीती, चूक केल्याची भावना, मानसिक तणाव किंवा लैंगिक कमतरता याला तोंड देतात आणि कुटुंबापासून वेगळी पडतात.
असे अत्याचार झालेल्या मुलांना मोठेपणी नातेसंबंधामध्ये बाधा येतात आणि लैंगिक संबंधामध्ये कमतरता येतात.  त्यापेक्षाही जास्त म्हणजे अशा अत्याचार झालेल्या मुलांमध्ये प्रत्येकावर संशय घेण्याची वृत्ती वाढते आणि ती फार काळ राहाते. कधीकधी जन्मभर हा परिणाम होतो. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते व लैंगिक संबंधांवरही याचा परिणाम होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)