बाल नाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण उत्साहात

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – चौदाव्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा व 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांचा प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्यात संपन्न झाला.

मागील आठवड्यात पुण्यातील भारत नाट्य मंदिर येथे 14 व्या महाराष्ट्र राज्य बाल नाट्य स्पर्धा व 56 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धांचा प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या केंद्रावर झालेल्या सर्व पारितोषिक विजेत्यांचा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने गौरव मान्यवर परिक्षक व नरेंद्र आमले, सुहास वाळूंजकर, शुभांगी दामले, विश्‍वास देशपांडे, सुहास जोशी, डॉ. अजय जोशी, गौरी लोंढे, पोर्णिमा गानू, प्रभाकर भावे, सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभासाठी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व सुरेश दाभाडे, राजेश बारणे उपस्थित होते

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव शाखेच्या नयना डोळस लिखीत “हॅलो ब्रदर्स’ या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच दिग्दर्शन प्रथम – क्षिप्रसाधन भरड व नयना डोळस, नेपथ्य प्रथम – क्षिप्रसाधन भरड, रंगभूषा प्रथम – मंगल चव्हाण व संगीता दहितुले,अभिनय प्रमाण पत्र – श्रद्धा भांगरे अशी पाच पारितोषिके मिळाली. कलापिनी तळेगावच्या “बिलीव्ह इन’ या नाटकासाठी प्रसन्न जोशी यालाही अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन मालिका कलाकार ऋतुजा बागवे व सचिन सुरेश यांनी केले होते. कार्यक्रमाला नाट्य अभिनेत्री लीना भागवत यांनी दिग्दर्शित केलेल्या विनोदी कार्यक्रमाने रंजकता आणली. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक सांस्कृतिक संचालक लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक संचालनालयाचे नाट्य विभाग प्रमुख मिलिंद बिर्जे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)