बाल दंत आरोग्य जनजागृती फेरी

पिंपरी – डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील विद्यार्थी व डॉक्‍टर्स आणि आय. डी. ए. पिंपरी-चिंचवड शाखा यांच्या वतीने संत तुकारामनगर परिसरात बाल दंत आरोग्य जनजागृती फेरी काढण्यात आली.

दंत आरोग्याविषयीचे माहितीपर फलक घेवून विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. गोपालकृष्णन, रजिस्ट्रार डॉ. शेळके, आय. डी. ए. चे अध्यक्ष डॉ. विकास बेंदगुडे, सचिव डॉ. मनिषा गरुड आदी उपस्थित होते.

-Ads-

डॉ. विकास बेंदगुडे म्हणाले की, बदलत्या जीवन शैलीमुळे बालदंत समस्या वाढल्या आहेत. त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे चांगल्या शारिरीक आरोग्यासाठी चांगल्या सवयींची गरज असते. संतुलित आहार, चांगली झोप आणि नियमित व्यायाम करणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे चांगल्या दंत आरोग्यासाठी देखील चांगल्या सवयी गरजेच्या आहेत. नियमित व व्यवस्थित दात घासणे, संतुलित आहार घेणे, वेळोवेळी दंत वैद्यांकडून दात तपासून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)