बाल्कनीतून पडून ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गाजियाबाद : राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली. सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मात्र त्यांना घटनेचा मागमूसही लागला नाही. घटना घडल्यानंतर ५ मिनिटांनी सोसायटीतील सदस्यांनी त्यांच्या परिवाराला या घटनेची माहिती दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांश बॉल्कनीतील सायकलवर चढून खाली वाकून पाहात होता. त्याचदरम्यान तो दुसऱ्या मजल्यावरील छतावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)