‘बाल्कनी’चा योग्य वापर

खरतरं निवांत वेळ मिळाली की, “रिलॅक्‍स’ होण्याची जागा म्हणजे घरातील टेरेस (बाल्कनी/गॅलरी). अलीकडच्या काळात घरासाठी मोठी जागा मिळणे तसं अवघडच, पण मिळालेल्या जागेचा योग्य वापरही आपल्याला करता आला पाहिजे.

सर्वात प्रथम बाल्कनीचे फ्लोरिंग तपासून द्या. ते वर-खाली, खडखडीत नाही ना हे बघावे. एखादी विशिष्ट थीम वापरून चित्राच्या सहाय्याने फ्लोरिंग डेकोरेटिव्ह करता येईल. या ठिकाणी दोन-तीन खुर्च्या ठेवल्यास निवांत क्षणी चहा घेण्याचा आनंद घेता येईल. बाल्कनी पुरेशी मोठी असेल तर एका बाजूला कौलारू शेड घालून एक वेगळी जागा तयार करता येईल. या ठिकाणी वाढदिवस, बारसे यांसारखे छोटे समारंभही करता येऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्याच्या फ्लॅट सिस्टिमच्या काळात प्रत्येकाला टेरेस मिळेलच असे नाही. मात्र, छोट्या आकाराची बाल्कनी नक्‍की असते. अशांनी आपल्या घराच्या बाल्कनीला सजवून घराच्या “लूक’मध्ये भर पाडावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)