बालेवाडी ट्रान्झिट हबचा मार्ग मोकळा

स्मार्ट सिटी मागविणार एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट 

पुणे – स्मार्ट सिटीकडून बालेवाडी येथील 11 एकर जागेवर ट्रान्झिट हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यास गुरूवारी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्वारगेट येथे प्रस्तावित मल्टिमॉडेल हबच्या धर्तीवर हे ट्रान्झिट हब उभारले जाणार असल्याची माहिती संचालक मंडळाचे सदस्य श्रीनाथ भिमाले आणि चेतन तुपे यांनी दिली. त्यानुसार, हा प्रस्ताव आता महापालिकेच्या मुख्यसभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच “पीपीपी’ तत्वावर हे हब उभारले जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या क्षेत्र निहाय विकासात ही हबची जागा आहे. त्या ठिकाणी सर्व वाहतूक सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी स.नं. 25 मधील 11 एकर जागेवर हे हब उभारले जाणार आहे. तेथे सुमारे 21 लाख चौरसफूट बांधकाम असणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)