बालेवाडीत आंतरविभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धा

राजगुरूनगर-शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्‌घाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे क्रीडा मंडळ प्रतिनिधी मनोहर कुंजीर, प्रा. गिरीश ढमाले, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. शोभा शिंदे, सायकलिंग प्रशिक्षक दीपाली निकम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय सातपुते, दीपाली शिलदणकर उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत पुणे शहर, पुणे जिल्हा, अहमदनगर आणि नाशिक अशा चार विभागातून आलेल्या सायकलिंग खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेतून निवडलेला संघ दि. 9 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पतियाळा (पंजाब) येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग (मुले व मुली) स्पर्धेकरिता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. प्रतिमा लोणारी व प्रा. योगेश मोहिते यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)