बालिकाश्रम रस्त्यावर तुटलेले ‘गतिरोधक’

नीलक्रांती चौक ते सावेडी रस्त्यावर अवघे 8 गतिरोधक
वाहने जातात भरधाव वेगाने
नेहमीच होतात किरकोळ अपघात

नगर – नीलक्रांती चौक ते सावेडी हा रस्ता रस्ता रूंदीकरणामुळे चांगला झाला असून, या रस्त्यावर गौतमनगर, ढोरवस्ती, जाधवमळा, सत्यमशिवम अपार्टमेंट,कॉसमीक सोसायटी, बागडेमळा, लेंडकरमळा, सुडकेमळा, बोरूडेमळा, भिंगारदिवेमळा, ताठेमळा, गंधेमळा धर्माधिकारीमळा, भूतकरवाडी असा नागरी वस्त्यांचा परिसर अंतर्भूत असून या रस्त्यावर महापालिकेने फायबरचे गतिरोधक बसविलेले आहेत.

बऱ्याच ठिकाणी गतिरोधकच नाहीत. या रस्त्यावरून स्टॅण्डकडून येणारी जाणारी वाहने रस्त्यावर गतिरोधकांचे प्रमाण कमी असल्यामुळे नेहमीच भरधाव वेगाने ये जा करीत असतात.नीलक्रांती चौक त सावेडी या रस्त्याचे अंतर 5 किलोमीटर असून, या रस्त्यावर अवघे 8 गतिरोधक आहेत. ते बऱ्याच ठिकाणी हे तुटलेल्या अवस्थेत आहेत. याच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास केंद्र असल्यामुळे साहजिकच या रस्त्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचीही नेहमीच दुचाकीवरून ये जा होत असते. याच रस्त्यावर बालिकाश्रम शाळा आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी देखील वर्दळ असते. या रस्त्यावर गतिरोधक तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे वाहनचालकांचा वाहन चालवितांना वाहनावर ताबा राहत नाही.

त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच किरकोळ अपघात हे होत असतात. नीलक्रांती चौकात तर चहूबाजूने वाहनांची ये जा होत असते. हा चौक सर्वात मोठा चौक आहे. परंतु वाहनाच्या वेगाला नियंत्रित करण्यासाठी या चौकात एकही गतिरोधक बसविलेला नाही. यामुळे बऱ्याच वेळेस या चौकामध्ये अपघात होत असतात. याचा किरकोळ अपघातातून मोठी जीवितहानीही होऊ शकते. नागरिकांनी याबाबत बऱ्याचवेळा गतिरोधक बसवावेत, अशी मागणी महापालिकेकडे करूनही तुटलेल्या गतिरोधक बदलण्यात आले नाहीत. नवीनही बसविण्यात आलेले नाहीत. याबाबत नागरिकांमधून महापालिकेबद्दल नाराजी व्यक्‍त होत असून, या रस्त्यावर ज्या ठिकाणी नागरीवस्त्या आहेत. त्याठिकाणी गतिरोधक बसवावेत.किंवा जे जुने गतिरोधक तुटलेले आहेत. ते दुरूस्त करावेत. लवकरात-लवकर या रस्त्यावर गतिरोधक बसविले नाहीत तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती नागरिकांतून व्यक्‍त होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)